Skip to main content
सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पोषक आहार आठवडा (National Nutrition week) म्हणून साजरा केला जातो. 1982 पासून हा आठवडा साजरा करण्यास सुरुवात झाली. आज त्याची सांगता आहे, या संदर्भात दिव्या सांगलीकर (  स्पोर्टस न्यूट्रीशिनिस्ट, ऑपरेशन्स हेड -जस्ट फॉर हार्टस) ह्यांनी  केलेले मार्गदर्शन.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात मुलांच्या आहारा कडे थोड्या फार प्रमाणात दुर्लक्ष होते. असे कोणी मुद्दाम करत नाही पण ऑफिसच्या कामा मुळे, कामातील ताणतणावपूर्ण वातावरणामुळे असे होणे स्वाभाविक आहे. सकाळी घर सोडलेलेे पालक जर रात्री उशिरा येत असतील तर या मध्ये ते तरी  काय करतील. पण अशा वेळी घरातील दुसऱ्या व्यक्तिने म्हणजे वडील, आजी, आजोबा,काका, काकू, मावशी यांनी या जबाबदाऱ्या सांभाळून घेतल्या पाहिजेत.
  • आपल्या मुलांना वेगवेगळ्या भाज्या बद्दल माहिती घडवून देण्यासाठी आठवड्यातून एकदा मुलांना भाजी मार्केट मध्ये घेऊन जाऊन त्यांच्या आवडीच्या भाज्या विकत घेणे. त्या त्यांना निवडण्या साठी, स्वच्छ करण्या साठी देणे. या अशा छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देऊन वेगवेगळ्या प्रकारातून मुलांना भाज्यांचे महत्व समजावून सांगता येते.
  • मुलांच्या एकाच प्रकारच्या सवयी बदलणे म्हणजे एकाच प्रकारची भाजी, एकाच प्रकरचे फळ खात असेल तर हळूहळू त्या मध्ये बदल घडवावेत. कोशिंबिरी मध्ये मुलांच्या ना आवडीच्या भाज्या म्हणजे दुधी भोपळा किंवा त्या प्रकारच्या भाज्या गपचूप थोड्या प्रमाणात टाकाव्यात.
  • वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे बनवणे
  • गव्हाच्या आणि रव्या च्या शेवया ची खीर बनवावी तसेच पुलावही बनवावा.
  • दुधाचे कोणतेही पदार्थ द्यावे, कारण दुधा मध्ये भरपूर प्रमाणात कॅलशियम असते ते शरीराच्या बऱ्याच उणिवा भरून काढते.
  • स्नॅक्सचे प्रमाण कमी करणे
  •  बेकरी पदार्थ, जंकफूड चा वापर खूप कमी प्रमाणात करावा.
अशा अनेक प्रकारच्या कल्पककृत्या वापरून आपण मुलांच्या चांगल्या पोषणासाठी सिंहाचा वाटा उचलू शकतो. शेवटी आपणच आपल्या मुलांची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.
जस्ट फॉर हार्टस  मध्ये 500 पेक्षा जास्त अनुभवी न्यूट्रीशन तज्ञ आहेत. गेल्या 10 वर्षात कंपनी ने 5000 पेक्षा वेलनेस चे कार्पोरेट इव्हेंट घेतले आहेत.

Leave a Reply

Close Menu

Let’s stay connected

Clinic Address

Dr. Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology
Sr Consultant Physician & Cardiologist
Moraya Hospital, Opp Main Bus Stop, Power House Chowk,
Chinchwadgaon, Pune - 411033, Maharashtra India
Contact No: +91 94229 91576

CIN: U85100PN2011PTC140068
GST: 27AACCJ6656J1Z6

Subscribe Now