Skip to main content

महिन्याभरापूर्वी सुभाष माझ्या क्लिनिकला आला होता. त्याला वजन कमी करायचे होते. सुमारे तासभर खपून (!) मी त्याचा डाएट चार्ट बनवला आणि एका महिन्याने त्याला फॉलोअपसाठी बोलावले.

महिना पूर्ण होण्याआधीच सुभाष हजर!

“काय रे, जमतंय का डाएट फॉलो करायला?” मी विचारले.

“सांगतो सांगतो, पण आधी वजन चेक करूया” सुभाष घाई-घाईने म्हणाला.

मी काही बोलायच्या आधी सुभाष वजन काट्यावर उभा राहिला देखील! पण क्षणार्धातच त्याचा चेहरा उतरला.

“वजन कमी झालेले दिसत नाहीये. अजून काही सुरूवात केली नाही वाटते” मी.

“फारच मोठी चूक केली मी. श्या…” सुभाष स्वतःशीच पुटपुटला.

“काय झालंय ते सांगशील का आता?” मी गोंधळून त्याला विचारले.

“मी डाएट प्लॅन फॉलो केलाच नाही!” सुभाष.

“मग???” मी अवाक!

“त्याऐवजी मी रोज साध्या पाण्याच्या जागी गरम पाणी प्यायला सुरुवात केली.
मला वाटले आता माझी चरबी वितळून जाईल आणि वजन झटपट कमी होईल.” सुभाष.

हा गैरसमज चांगलाच माहितीतला असल्यामुळे सुभाषचे बोलणे ऐकून मला धक्का बसला नाही.

“अरे मला फोन करून विचारायचेस तरी!” मी.

“डाएट न करता वजन कमी करून मला तुम्हाला सरप्राईझ द्यायचे होते. पण झाले उलटेच.. मलाच मोठे सरप्राईझ मिळाले!” सुभाषला आता स्वतःवरच हसू येत होते!!
“पण का होत नाही असे? चरबी तर गरम पाण्यात विरघळते ना?” सुभाष.

“गरम पाण्यात विरघळण्यासाठी चरबी आणि गरम पाणी यांना एकमेकांच्या संपर्कात तरी यावे लागेल! आपल्या शरीरात चरबी एकतर त्वचेच्या आवरणांखाली किंवा आपल्या अंतर्गत अवयवांभोवती साठवलेली असते. आपण पितो त्या पाण्याचा शरीरातल्या चरबीशी कोणत्याही प्रकारे direct संपर्क येत नाही. त्यामुळे गरम पाणी पिऊन चरबी वितळायचा / कमी व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही!” मी.

“हो का? मी तर खूशच झालो होतो इतका सोप्पा उपाय वाचून!” सुभाष.

“अरे बाबा, इतके सोपे नसते वजन कमी करणे. ती एक तपश्चर्या असते. आपल्या मनावर आपला पूर्ण संयम लागतो, प्रचंड जिद्द लागते. आहारातील केवळ एखाद्या घटकावर / पदार्थावर भर देऊन वजन कमी होत नाही. त्यासाठी संपूर्ण आहारच सुधारावा लागतो.” मी.

सुभाष क्षणभर विचारमग्न झाला.

“अरे वजन कमी करायला असे इन्स्टंट उपाय असतील तर आम्हा आहारतज्ञांना कामच काय??” वातावरणातला ताण हलका करण्यासाठी मी म्हटले.

“तेही खरंच! आता आजपासूनच डाएट सुरू करतो!!” सुभाष हसत हसत म्हणाला.

—————————————————–

आपला अनुभव या बाबतीत काय सांगतो? आमच्याबरोबर नक्की शेअर करा!

Leave a Reply

Close Menu

Let’s stay connected

Clinic Address

Dr. Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology
Sr Consultant Physician & Cardiologist
Moraya Hospital, Opp Main Bus Stop, Power House Chowk,
Chinchwadgaon, Pune - 411033, Maharashtra India
Contact No: +91 94229 91576

CIN: U85100PN2011PTC140068
GST: 27AACCJ6656J1Z6

Subscribe Now