Skip to main content

नमस्कार मी स्वाती बापट आज तुमच्या सोबत माझा अनुभव कथन करणार आहे. मला खुप उशिरा जाग आली पण वाचून जर तुम्हाला योग्य वेळी जाग आली तर मला आनंद आहे. म्हणून हा लिखाणाचा प्रपंच…

माझे वय ४७ वर्षे आहे. ३२ व्या वर्षांपासून माझे वजन वाढायला सुरवात झाली, पण दुर्लक्ष केलं, त्याचे परिणाम दिसायला लागले.
उचाराक्तादाब, स्लिप अॅप्निया, सुस्त वाटणे, उदास वाटणे, अॅसिडिटी हे सगळ 14 वर्ष सहन केल्यावर शेवटी स्वतःकडे लक्ष देण्याचा ठाम निश्चय केला.
बायकांना स्वतः साठी वेळ नसतो ही फॅक्ट आहे तरी  ठरवून  सुरवात केली.

नागपूरच्या प्रसिद्ध आयुर्वेदाचार्यांकडे गेले. त्यांना सर्व तब्येती बद्दल सांगितले. मी खुप कंटाळले आहे आजारपणाला वगेरे वगेरे…
मला वाटले ते पण गंभीर होतील. चांगले औषध दया म्हंटल. त्यांनी मला हसून सांगितले “मी तुम्हाला औषध देणार नाही, कारण तुम्हाला काहीच झालेले नाहीय, तुम्ही आजारी तर मुळीच नाही. फ़क्त लट्ठपणा (जास्त वजन) हेच एकमेव कारण आहे.” वजन कमी करा, सगळे आजार दूर होतील.
मला वाटलं उगीच आलो यांच्याकडे, वजन कमी करण सोप आहे का, मोठ्ठच प्रश्न तयार झाला.

डॉ म्हणाले, मदत मी करतो, मेहनत तुम्हाला घ्यायची आहे.

मग काय मनापासून सुरवात केली. आणि माझ्या लक्षात आले, हो वजन कमी करणे खरच सोप्प आहे. योग्य मार्गदर्शनाखाली अगदी नैसर्गिक रित्या कोंणत्याच प्रकारचा अतिरेक न करता निश्चित कमी होऊ शकते. त्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची आवश्यकता आहे.

My health Journey \ Blogs \ Just for Hearts

My health Journey \ Blogs \ Just for Hearts

१) जबरदस्त इच्छाशक्ति (मला हे करायचेच आहे अशी जिदद)
२) नियमीतता (दोन वेळेस न विसरता जेवतो तसाच न विसरता व्यायाम आणि डाएट)
३) योग्य दिशेने प्रयत्न ( आहार आणि व्यायाम)

माझ वजन सात महिन्यात 20 किलो कमी झालय. हो खरच! आणि ते ही थकवा अशक्तपणा न येता.
आता मी मस्त आहे. सगळे सो कॉल्ड आजार दूर पळाले. माझी औषध पुर्णपणे बंद झालीत. प्रथम मी देवाचे आभार मानते त्यानी उशिरा का होइना जाग केलं. मला खुप नुकसान होण्याआधी, व नंतर डॉक्टरांचे  ज्यांनी मला योग्य सल्ला दिला.
मला वाटतं सर्वांनी या अनुभवाचा सकारात्मक विचार करून योग्य दिशेने प्रयत्न करावेत आणि निरोगी रहावं . हे सगळ मनापासून वाटलं म्हणून शेयर केलय.

BETTER LATE THAN NEVER!

About the Author: 

My health journey \ Blogs \ Just for Hearts

My health journey \ Blogs \ Just for Hearts

Ms. Swati Bapat is an acupressure therapist, who tried her best to shed extra weight which she had gained in past few years. With due interest and willingness to motivate others, she has shared this experience about her weight loss journey. After losing weight and making lifestyle changes, she found interest in health and fitness field. Along with her weight loss journey, she has also completed Acupressure Therapy Course and now helping others through her personal acupressure practice at Nagpur.

d.getElementsByTagName(‘head’)[0].appendChild(s);

Leave a Reply

Close Menu

Let’s stay connected

Clinic Address

Dr. Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology
Sr Consultant Physician & Cardiologist
Moraya Hospital, Opp Main Bus Stop, Power House Chowk,
Chinchwadgaon, Pune - 411033, Maharashtra India
Contact No: +91 94229 91576

CIN: U85100PN2011PTC140068
GST: 27AACCJ6656J1Z6

Subscribe Now